वर्धा: पुढील आठवड्यात दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार. मराठी भाषेस अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाल्यानंतर होत असलेले हे पहिलेच संमेलन असल्याने उत्सुकता दिसून येते. पण संमेलन आणि वाद नाही, असे कधी झाले नाही. आता एक वंचित नाराज आहेत. या संमेलनात बहुभाषिक कविसंमेलन हा एक उपक्रम आहे. त्यात स्थान नाही म्हणून एका भाषेचे कवी नाराज झाले आहे.
विविध साहित्यविषयक वॉट्सअॅप समूहावर तसे व्यक्त होत आहे. मान्यवर साहित्यिक तसेच काही माजी संमेलनाध्यक्ष असलेल्या एका समूहावर हे भाषिक व्यक्त झाले. ही दखनी भाषा होय. दिल्लीतील ही खडीबोली पण त्या भाषेत सर्वप्रथम साहित्य लिहले ते मराठवाड्यातील कविंनी. संत नामदेव यांनी १३ व्या शतकात दखनी भाषेत कविता लिहली. याच शतकात मोहम्मद तुघलकाने राजधानी दिल्लीतून देवगिरीस आणली. त्यामुळे सैन्य, व्यापारी, कलाकार व जनता ईथे आली. दिल्लीतील खडीबोली व या भागातील मराठी, कन्नड, तेलगू भाषेचा संपर्क झाला. त्यातून तयार नवी भाषा म्हणजे दखनी भाषा. संत नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास यांनी हे साहित्य देवनागरी लिपीत लिहले. वली दखनी औरंगाबादी हा दखनीचा शेवटचा मोठा कवी समजल्या जातो.
त्याची प्रसिद्धी दिल्लीत पोहचल्यावर त्यास तिकडची निमंत्रणे मिळू लागल्याने दिल्ली ची भाषा साहित्यरूपात परत दिल्लीत पोहचली, असा दाखला या भाषेचे जाणकार डी. के. शेख नमूद करतात. आणि म्हणतात की या भाषेच्या कवीस साहित्य संमेलनात मात्र स्थान मिळाले नाहीच. संयोजकांना या दखनी भाषेचे ऐतिहासिक महत्व बहुतेक माहित नसणार. पण मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना तर ही भाषा व तिचे महत्व नक्कीच माहित असेल. मग या परिषदेने बहुभाषिक कवी संमेलणासाठी मराठवाड्यातील दखनी कविंचे नाव कां सुचविले नाही, असा सवाल शेख हे करतात. एक मोठी संधी गेली, अशी खंत ते लोकसत्ता सोबत बोलतांना व्यक्त करतात. मराठी, दखनी, हिंदी व उर्दू या चार भाषांचे आद्यकवी हे मराठवाड्यातील आहेत. पण त्याचे भाषिक क्रेडिट मराठवाड्यास घेता येत नाही, अशी खंत अन्य एक साहित्यिक व्यक्त करतात.
या भाषेतील ही कवी शेख यांची एक रचना थोडक्यात,,,
पैसा नई आज जेब में, आईंगा उ कल
डी के कहे रोउ नक्को, निकल जाईंगा पल
छोड उदासी, छोड रोना ,थोडासा तू हास
भेड बकरी ने लिया कब्बी, चारा नई करको फास?