वर्धा : जिल्हा परिषदेच्या कानगाव शाळेत राजू कांबळे हे शिक्षक तिसऱ्या वर्गास शिकवतात. शनिवारी ते मद्यधुंद होतच शाळेत पोहचले. नाशेतच पाढे शिकविणे सुरू केले. अशा अवस्थेतील शिक्षकाची माहिती शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी पाहणी केली तेव्हा हे शिक्षक नशेत झिंगताना दिसले. पोलीस पाटील अर्चना मोहिजे यांनीही शाळा गाठली. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाची हजेरी घेत गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा आजीमाजी विद्यार्थी ठरविणार; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा निर्णय

दुसऱ्या एका घटनेत दारु पिवून झिंगाट करणाऱ्या पंकज ढोबळे याला गावकऱ्यांनी अद्दल घडविली. पिंपळगाव वडाळा येथे ग्रामसभा सुरू असताना आरोपी ढोबळे याने दारूच्या नशेत गडबड सुरू केली. त्याला आवर घालणारे ग्रामसेवक नितीन साव यांनाच मारहाण केली. पुढे खुर्च्या फेकणे सुरू करीत शिवीगाळ केली. भयभीत गावकऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha district at kangaon zilla parishad school drunkard teacher beaten up by the villagers pmd 64 css
Show comments