वर्धा : सिंदी येथील एका पंधरा वर्षीय मुलीचे सूत तिच्या नातलगाच्या शेजारील व्यक्तींशी जुळले. त्याची कुणकुण लागताच मुलीने आईला खरे ते सांगितले. आईने मग त्या व्यक्तीशी आपल्या मुलीचा विवाहच लावून दिला.
काही महिन्यांनी पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी घरचे घेवून गेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासात पीडिता दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत अवगत केले. तपासात धक्कादायक माहिती समोर आली.
हेही वाचा – यवतमाळ : १४ वर्षीय बालकाने घेतला गळफास, तर १४ महिन्यांच्या बालकाचा टाक्यात बुडून मृत्यू
मुलगी अल्पवयीन असूनही तिचा बालविवाह लावून दिला म्हणून तिच्या घरच्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच तिचे लैंगिक शोषण केल्याचा ठपका ठेवून तिघांविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. पोक्सो शाखेच्या अनुराधा फुकट पुढील तपास करीत आहे.