वर्धा : अधिकारपदाची नशा व त्यात पुन्हा मद्यही ओतल्या गेले तर मग पाहायलाच नको. असेच या घटनेत झाले. मात्र सार्वजनिक तमाशा झाल्याने चांगलीच चर्चा उसळली.

झाले असे की, देवळी पंचायत समितीच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा विवाह कळंब येथे असल्याने त्याचे कर्मचारी बंधूही पोहोचले. त्यात एक कृषी अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, आपले सरकार केंद्राचा एक अधिकारी व अन्य कृषी दौऱ्याच्या नावाखाली कळंबला धडकले. यापैकी काही विरंगुळा म्हणून बारमध्ये शिरले. दारू पिल्यानंतर बाहेर पडत असताना त्यांच्या वाहनाचा धक्का दुसऱ्या एका वाहनास बसला. त्यामुळे चांगलाच वाद सुरू झाला.

Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
MLA sameer kunawar reaction on not getting place in cabinate minister
वर्धा : कोण म्हणतो मी नाराज! ‘हे’ आमदार म्हणतात, ‘मंत्री पदाची इच्छा…’
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
loksatta readers feedback
लोकमानस: तात्कालिक स्वार्थाचा विचार हेच कारण

हेही वाचा – नागपूर : शहरातील दहन घाटच ‘मरणासन्न’!

एका अधिकाऱ्याने दुसऱ्याच्या नाकावर मारल्याने तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे गावातील नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली. काहींनी संतप्त होत एका अधिकारी व कर्मचाऱ्यास पकडून बेदम धुतले. ही मारहाण पाहून त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र पळ काढला. शेवटी प्रकरण कळंब पोलिसांत दाखल झाले. तिथे बुधवारी रात्रीपर्यंत बराच काथ्याकूट झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा – विदर्भातही शिंदे गटाच्या विरोधात भाजपमध्ये खदखद वाढली

ठाण्यातील अभय चोथनकर म्हणाले की, वाद झाल्याने दोन्ही गट ठाण्यात आले होते. तक्रार दाखल करणार असल्याचे म्हणाले. पण पुढे आपसात तोडगा काढणार असल्याची माहिती देण्यात आली. इकडे वर्धा जिल्हा परिषद कृषी अधिकारी बमनोटे म्हणाले की, हा प्रकार समजल्यावर वरिष्ठांना माहिती दिली. आता त्यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई करू.

Story img Loader