वर्धा : गुजरातचे व्यापारी कमलेश शहा यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या अठ्ठेसिंग सोलंके हा गत काही दिवसांपासून त्यांच्या नागपूर कार्यालयात कामास आहे. नागपूर कार्यालयाचे नितीन जोशी यांच्याकडून ४ कोटी ५२ लाख रुपये घेवून सोलंके हा कारने नागपुरातून हैद्राबादकडे निघाला होता. वाटेत समुद्रपूर तालुक्यातील पोहणा येथे एक कार सायरन वाजवीत त्यांच्या मागे आली. त्यातून चार इसम उतरले. या चौघांनी प्लास्टिकच्या काठ्यांनी दरडावून सोळंके यास गाडीतून खाली खेचले. मारहाण करीत पैश्याबाबत विचारणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : सत्ताधारी आमदारांना पोसण्यासाठी शासनाच्या तिजोरीतून लूट, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

डोक्यावर बंदूक ताणत धमकी दिल्याने सोलंकेने रक्कम दिली. त्यानंतर चौघेही कारने पसार झाले. सोलंकेने लगेच वडनेर पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी तपास पथक सज्ज केले. या दहा पथकांनी लगतच्या जिल्ह्यात शोध सुरू केला. तांत्रिक तपास कामी आला. अवघ्या पाच तासात तीन आरोपी गळास लागले. आरोपी शेख अलीम शेख लतिफ, ब्रिजपाल मेहेरबान सिंग ठाकूर व दिनेश रुपचंद वासनिक यांना नागपुरातून अटक झाली आहे. त्यांच्याकडून ३ कोटी २६ लाख रुपयाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी रडारवर असून ते पण लवकरच सापडतील, अशी खात्री पोलीसांनी दिली आहे.