वर्धा : विश्र्वकुंज पिक्चर्सचे प्रकाश पवार यांनी बलोच हा मराठी चित्रपट शाळांमध्ये दाखविण्याची परवानगी शासनाकडे मागितली होती. काही अटी टाकून शालेय शिक्षण विभागाने त्यास परवानगी दिली आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांच्या असीम धैर्याचा, शौर्याचा, कर्तृत्वाचा रणसंग्राम यात चित्रित करण्यात आला आहे. तो विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. ऐतिहासिक मांडणी असलेला हा चित्रपट विजयगाथा सांगतो. मात्र केवळ दहा वर्ष वयोगटापुढील विद्यार्थ्यांनाच हा चित्रपट पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांवर सक्ती करता येणार नाही.

हेही वाचा : वाशीम : भर वस्तीत मंदिरासमोर निर्घृण हत्या, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अध्ययनात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. शाळांमधून दाखविताना कोणताही वाद झाल्यास किंवा तक्रारी आल्यास संबंधित संस्थेस दिलेली परवानगी रद्द केली जाणार आहे. चित्रपट पाहण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून वीस रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारता येणार नाही. २०२३ – २४ या एका वर्षासाठी ही परवानगी मिळाली आहे. शासनाच्या परिक्षण समितीने अहवाल दिल्यानुसार या बाबी ठरल्या आहेत.

Story img Loader