वर्धा: नद्या, तलाव,ओढे विहिरी येथे मुर्त्या विसर्जन केल्यास जल प्रदूषण वाढते.ते टाळावे म्हणून स्वयंसेवी संस्थांनी सिमेंटचे टाके, मोठे ड्रम , कृत्रिम हौद गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्याची चळवळ सुरू केली. त्यास आता उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. व्हीजेएम अर्थात वैद्यकीय मंचच्या ऑक्सीजन पार्क येथे असलेल्या टाक्यावर भक्तांची गत पाच दिवसांपासून झुंबड उडत आहे. एक हजारावर मुर्त्यांचे या ठिकाणी विसर्जन झाल्याचे संयोजक डॉ.सचिन पावडे यांनी सांगितले. पर्यावरण पूरक विसर्जन सोहळा करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. या ठिकाणी दुपारी व रात्री पण विसर्जन करण्याची सोय करण्यात आल्याचे श्याम भेंडे यांनी नमूद केले.या शिवाय महाराष्ट्र अनिसतर्फे स्वाध्याय मंदिर येथे असे विसर्जन सुरू झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… गणेश विसर्जन करून परतणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक; एक गंभीर, पाच जखमी, संतप्त नागरिकांनी ट्रक जाळला

हेही वाचा… अमरावती: प्रवाशांसाठी आनंदवार्ता; विशेष रेल्‍वेगाड्यांच्‍या ४२ फेऱ्या वाढल्‍या

अनिसने पालिका प्रशासनाकडे शहरात ठिकठिकाणी अशी व्यवस्था करून देण्याची विनंती केली होती. तशी सोय झाल्याचे गजेंद्र सूरकार म्हणाले. यासाठी उच्च न्यायालयापर्यंत लढा द्यावा लागल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. आज दुपारपासून व्यक्तिगत तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन करण्यास सुरवात केलेली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha environment friendly ganesha devotees prefer artificial ganesh visarjan kendra instead of rivers lakes pmd 64 asj