वर्धा : चितळाच्या मांसावर ताव मारणाऱ्या दहा खवय्यांवर वन विभागाने बडगा उगारला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. सावंगी येथील एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजीत करण्यात आली होती. त्यात वन्यप्राण्याचे मांस शिजवल्याची माहिती बाहेर आली. या मित्रांपैकीच एकाने शिजलेले मटन काढून ठेवले होते. त्यातून वाद झाला. त्यापैकीच एकाने वन खात्यास ही माहिती कळविली.

हेही वाचा : बलोच ! मराठ्यांची शौर्यगाथा राज्यातील शाळांमध्ये दाखविणार

वन खात्याने धाड टाकून पाहणी केल्यावर शिजवलेले मांस चितळाचे असल्याचे दिसून आले. लगेच कारवाई झाली. दोघांना अटक करण्यात आली. मात्र आठ आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले. सुमीत मून व प्रभाकर चोंबे यांना आज न्यायालयात हजर केल्यावर त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. इतर आरोपींना लगेच अटक केल्या जाईल, अशी खात्री वन अधिकारी रूपेश खेडकर यांनी दिली.

Story img Loader