वर्धा : पंचतारांकित म्हटल्या जाणारी तसेच स्टेट ऑफ दी आर्ट अशी रुग्णालये आता आरोग्य क्षेत्रात परवलीचा शब्द झाली आहे. मोठी उलाढाल असणारा हा व्यवसाय कोरोना काळात चांगलाच चर्चेत होता. पण त्या काळात सुद्धा विदर्भातील मोजक्या रुग्णालयांनी मोफत सेवा देण्याचे कार्य पार पाडले. त्यात सावंगी येथील रुग्णालयाची शासनानेही प्रशंसा केली होती. या संस्थेचे संस्थापक माजी खासदार दत्ता मेघे यांनी एका सोहळ्यात आपली भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : भाजपसह शिंदे गटाचे मंत्री, आमदार रेशीमबागेतील स्मृती मंदिरात; डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्या समाधींचे घेतले दर्शन

ते म्हणतात वाणाडोंगरी तसेच सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी या तीनही रुग्णालयात मोठ्या प्रमाणात उपचार होतात. हे केंद्र आरोग्य सेवेसाठी असतात. नफा कमविण्यासाठी नसतात. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, कॅन्सर, भौतीकोपचार या सेवेतून आर्थिक लाभ मिळत नाही. मात्र त्यातून ईश सेवेचे समाधान लाभते. महागड्या उपचारांसाठी शासनाच्या योजना असल्याने त्यातून मदत होते. तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कामध्ये आरोग्यसेवा देणे शक्य होते. मात्र कोणतीच तरतूद नसल्यास रुग्ण परिवाराने सहकार्य करणे अपेक्षित असते, अशी भावना दत्ता मेघे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : दुसरीपर्यंतची शाळा सकाळी नऊनंतरच !शिक्षणमंत्र्यांची घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

खासदार रामदास तडस म्हणाले की सावंगी रुग्णालयाने कोरोना काळात दिलेल्या सेवेमुळे मध्य भारतातील हजारो लोकांचे प्राण वाचले. मेघे उच्च शिक्षण संस्थेचे विशेष अधिकारी डॉ. उदय मेघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सेलू येथे आरोग्य महशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार पंकज भोयर यांनी पण सावंगी रुग्णालयाने चालविलेल्या आरोग्य कार्याची प्रशंसा केली. डॉ.उदय मेघे म्हणाले की या शिबिराचा लाभ साडेतीन हजारावर ग्रामीण रुग्णांना मिळाला आहे. त्यांच्यावर मोफत निदान व उपचार करण्यात आले असून गंभीर रुग्णांवर सावंगी येथे उपचार होतील.प्रवास व भोजन निःशुल्क असेल. या प्रसंगी सुमित वानखेडे, नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, नवीन चौधरी, सुनील गफाट, अविनाश देव, शैलेंद्र दफ्तरी, कुलगुरू डॉ.ललितभूषण वाघमारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.सचिन घोडे व डॉ.चंद्रशेखर महाकाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र सांभाळले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha former mp datta meghe all hospitals in loss but running it for charity pmd 64 css