लोकसत्ता टीम

वर्धा: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचारी हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर रुष्ट आहेत. त्यांच्या समस्या आयटक संघटनेने २० मार्चला झालेल्या बैठकीत मांडल्या होत्या. दोन तास चर्चा झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होण्याआधी कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथिल करून समायोजित करण्याचे शासनाने मान्य केले.

पंधरा वर्षांपासून सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी अशी पदे भरणे अपेक्षित होते. इतर राज्यांप्रमाणे हा न्याय लागू करण्याची मागणी होती. पण पूर्ण झाली नाही. आता या मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी व विधानसभेत शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण होण्यासाठी १७ मे रोजी राज्यभर आंदोलन चालेल, अशी माहिती संघटना अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी दिली आहे. रेखा तरके, अंजली राठोड, संजय देशमुख, संगीता तेवढे, हेमलता पांडव, सुप्रिया पाटकर, अमिता, स्वप्नाली ठवकर, सुमन फुले, मीनाक्षी मोरे, कृष्णा माने, कृपाली पाटील, लक्ष्मी माळी, मोनाली खांडेकर हे पदाधिकारी नेतृत्व करणार.

Story img Loader