वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील वाद चांगलाच चिघळत चालला आहे. कुलगुरू रजनीश कुमार शुक्ल यांना पदावरून हटविण्यासाठी विद्यार्थी आडून बसले आहेत. नैतिकता ठेवावी व राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.
गत दीड महिन्यापासून विद्यापीठ परिसर वादाने गाजत असून वारंवार पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. रात्रभर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. परिणामी शुक्ल यांना पोलीस संरक्षणात बाहेर पडावे लागले.
हेही वाचा – राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत, १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार
हेही वाचा – ‘मध्य प्रदेश’कडून आंतरराज्यीय तपासणी पथनाके बंद, महाराष्ट्रकडून टाळाटाळ कशाला?
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी विद्यापीठ अधिकाऱ्यांना बोलावून कायदा व सुरक्षेबाबत चर्चा केली. जनसंवाद विभागाचे प्रा. धर्मेश कथेरिया यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे निलंबन परत घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून घरली आहे. त्यात पण समर्थक व विरोधक असे दोन गट पडले आहे. रोजच्या घोषणाबाजीने वातावरण ढवळून निघाले आहे.