वर्धा : येथील चन्नावार्स विद्यामंदिरची विद्यार्थीनी ईशा अमीत पुजारी दक्षिण विभागीय जलतरण स्पर्धेत पदक प्राप्त केले असून नागपूर विभागातील ती एकमेव पदकप्राप्त विद्यार्थीनी ठरली आहे. बंगळूरु येथे सीबीएसई मंडळाच्या दक्षिण विभागीय मंडळांच्या शाळांची जलतरण स्पर्धा संपन्न झाली. त्यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू व आंध्रप्रदेश या राज्यातील मुलींनी सहभाग नोंदविला होता. त्यात ईशा पुजारीने २०० मिटर ब्रेस्टस्ट्रोक जलतरण प्रकरणात नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व केले. त्यात तिला कास्यपदक प्राप्त झाले.
हेही वाचा : नक्षलींचा पुन्हा रक्तपात, तरुणाची गोळ्या घालून हत्या; महिनाभरात तीन हत्यांनी दक्षिण गडचिरोलीत दहशत
क्षेत्रीय स्पर्धेतील हे तीचे सलग दुसरे यश आहे. यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत ईशाने सुवर्ण व राैप्य पदक प्राप्त केले आहे. यशाचे श्रेय ती आई डॉ.अंजली,वडील डॉ. अमित पुजारी,संस्थेचे संस्थापक दिनेश चन्नावार, प्रशिक्षक रंजना वानखेडे, प्राचार्य अपूर्वा पांडे यांना देते. ईशाच्या यशाबद्दल वर्धेच्या क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.