वर्धा : बाबरी मशिदीच्या पडझडीचे प्रत्यक्ष ते आता राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे क्षण पाहणाऱ्यांना उपस्थित राहता येत नसल्याची खंत पण ‘मंदिर वही बनायेंगे’ साकार होत असल्याबद्दल अतीव आनंद होत आहे. १९९२ ते २०२४ अशा राम मंदिराच्या ऐतिहासिक चळवळीचे आता मोजकेच साक्षीदार कदाचीत असतील. २२ तारखेला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा अभुतपूर्व सोहळा होत आहे. त्यास १९९२ च्या घटनेवेळी हजर असलेल्यांना निमंत्रण अपेक्षीत होतेच. मात्र प्रशासकीय कारणास्तव ते मिळाले नाही. पण त्याची खंत त्यावेळी अवघ्या विशीत तर आता पन्नाशी पार करणाऱ्यांना निश्चित आहे. पण त्यावर मंदिर साकारण्याचा आनंद मात करतो. ६ डिसेंबर १९९२ ला मस्जिद पडली. त्यावेळी वर्ध्यातून विलास भिमनवार, दिनेश देशपांडे, मोहन सालोडकर व बंधू जयंत सालोडकर तसेच जावई संजय देशपांडे, प्रशांत काळे, टिन्या देशमुख, प्रवीण वखरे, मुकूंद पिंपळगावकर, शिवाजी अडसड, अजय जलताडे ही युवा मंडळी कारसेवेसाठी गेली होती.

हेही वाचा : गडकरी सकाळी नागपुरात, दुपारी पुण्यात, सायंकाळी पुन्हा नागपुरात

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
Ramdas Athawale, Panvel Candidate Prashant Thakur,
राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

भाजपचे माजी नगरसेवक असलेले जयंत सालोडकर हे सर्वात लहान म्हणजे १५ वर्षाचे तर भिमनवार हे २१ वर्षाचे होते. वय लहान पण उर्मी मोठी. त्यामुळे घरच्यांची संमती मिळाल्यानंतर त्यांचा तत्कालिन फैजाबादच्या दिशेने प्रवास सुरू झाला. नागपूर-ईटारसी-जबलपूर-कटनी-अलाहाबाद आणि शेवटी फैजाबाद असा प्रवास ४ डिसेंबरच्या रात्री पूर्ण झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विश्व हिंदू परिषद यांच्या सौजन्याने निवास व भोजन व्यवस्था झाली होती. ६ डिसेंबरला सकाळीच विवादास्पद स्थळाच्या दिशेने कूच केले. सर्वत्र अभूतपूर्व गर्दी होती. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व अन्य नेत्यांची भाषणे ही मंडळी ऐकत असतांनाच अनावर कारसेवकांचा हल्लाबोल सुरू झाला. सर्व मस्जिदीच्या दिशेने धाव-भेट सुटले. वर्धेकर ही कुमारवयीन मंडळी पण धावली. मात्र पोलीस पहारा भेदू शकली नाही. पण ज्या कार्यासाठी आलो ते याची देहा, याची डोळा पूर्ण झाल्याचे समाधान मात्र लाभले. त्यानंतर गोंधळ वाढू लागल्याने ही मंडळी आपल्या चार किलोमीटर अंतरावरील धर्मशाळेत सुखरूप पोहचली. पोलीस बंदोबस्त असल्याने भिती वाटली नाही, असे जयंत सालोडकर सांगतात.

हेही वाचा : न्यायालयातील ‘ई-फायलिंग’ला वकिलांचाच विरोध, ही आहेत कारणे

अलाहाबाद ते नागपूर या कारसेवक स्पेशल ट्रेनने ते गावी परतले. या प्रवासाचा एक मोलाचा ठेवा त्यांनी कायमचा जपला. रेल्वे प्रवासात असतांना त्यांच्यासोबत कोल्ब क्लॉउज हा एक जर्मन पत्रकार फैजाबादसाठीच निघाला होता. त्याच्याशी गट्टी झाल्यावर त्याला फोटो काढण्याची विनंती केली. हा प्रवासातील फोटो एक अजरामर ठेवा. कारण फोटो काढण्याची सोय कुण्याच कारसेवकाकडे नव्हती. म्हणून तो मिळावा यासाठी पत्रकाराला विनंती केली. त्यानेही वर्धेच्या दिलेल्या पत्यावर फोटो पाठविल्याने ही मंडळी कमालीची आनंदली. त्या चमूचे कर्णधार व आता निवृत्त ग्रंथपाल असलेले विलास भिमनवार म्हणतात की कारसेवा सार्थकी लागल्याचा आनंद आहे. जन्माचे सार्थक झाले.