वर्धा : वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शाखेतील पदव्यूत्तरच्या विद्यार्थ्यांना अधिकृत सुट्या देण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना प्रथमच अधिकृतपणे सुट्या देण्याचा निर्णय झाला आहे. साप्ताहिक सुट्टीसोबतच वीस किरकोळ रजा (सीएल) रजा यापुढे मिळतील. तसेच पाच दिवसांची शैक्षणीक रजाही मिळणार आहे. महाविद्यालयाच्या रूग्णालयाचा भार याच पदव्यूत्तर विद्यार्थ्यांवर असतो. रूग्णालयाचे दैनंदिन प्रशासन तसेच रूग्णसेवेची जबाबदारी कनिष्ठ डॉक्टर म्हणून यांच्यावरच अलिखीतपणे सोपविल्या जाते. त्यासोबतच पदव्यूत्तर पदवीचा अभ्यास करणे आलेच. यात हे विद्यार्थी पिचून जात असल्याची ओरड होत होती. कामाचा ताण असह्य झाल्याने देशभरात अश्या २४ विद्यार्थ्यांनी वर्षभरात आत्महत्या केल्याची आकडेवारी आहे. ही गंभीर बाब म्हणून वैद्यकीय संघटना तसेच ‘मार्ड’ व अन्य संघटनांनी यावर उपाय शोधण्याची विनंती केंद्राकडे केली होती.
वैद्यकीय शाखेतील पदव्यूत्तरच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांंबाबत वैद्यक आयोगाने शोधला ‘हा’ उपाय
कामाचा ताण असह्य झाल्याने देशभरात अश्या २४ विद्यार्थ्यांनी वर्षभरात आत्महत्या केल्याची आकडेवारी आहे.
Written by प्रशांत देशमुख
वर्धा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-01-2024 at 09:10 IST
TOPICSआरोग्य विभागHealth Departmentमराठी बातम्याMarathi Newsवर्धाWardhaवैद्यकीय महाविद्यालयMedical Collegesवैद्यकीय शिक्षणMedical Education
+ 1 More
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha medical commission gives 20 casual leaves for post graduate students to prevent suicide pmd 64 css