वर्धा : अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कट्टर राजकीय वैर असणारे राजकीय नेते एकत्र झाल्याचे दुर्मिळ दृष्य दृष्टीस पडले. आर्वी येथे सोमवारी रात्री जनता नगरची रामयात्रा निघाली होती. त्याचवेळी तेलंग राय दुर्गा उत्सव समितीतर्फे गांधी चौकात महाआरती करण्यात आली. रामाची मूर्ती आरुढ असलेल्या रथाची प्रदक्षिणा सुरु झाली. त्यात आमदार दादाराव केचे, माजी आमदार अमर काळे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे हेही सहभागी झाले.

विशेष बाब म्हणजे, या तिघांनाही एकत्रित रथ ओढण्याचा आग्रह यावेळी करण्यात आला. तो या तिघांनी खुशीने मान्य करीत रथास ओढत काही दूर पुढे नेले. ही बाब उपस्थित नागरिकांसाठी नवलपरीची ठरली. कारण उघड आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे तिघेही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. भाजपतर्फे केचे किंवा वानखेडे तर काँग्रेसतर्फे काळे यांची उमेदवारी पक्की समजल्या जाते. या तिघांचे विळ्या-भोपळ्याचे वैर सर्व मतदार ओळखून आहेत. या तिघांचे एकत्रित येणे अत्यंत दुर्मिळ बाब असल्याने रामाच्या रथाचे त्यांनी केलेले सारथ्य चर्चेची बाब ठरली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : कुनो राष्ट्रीय उद्यानात पुन्हा पाळणा हलला, ‘ज्वाला’ चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिला

भाजपमध्ये केचे व वानखेडे यांच्यात रंगलेली स्पर्धा संपूर्ण मतदारसंघातच नव्हे तर पक्षातसुद्धा कळीचा मुद्दा आहे. कामाचे श्रेय कोणाचे यावरून वाकयुद्धही रंगले. केचे यांनी तर वरिष्ठ नेत्यांनाही आव्हान देण्यास पुढेमागे पाहले नाही. मात्र, रामासमोर हा वैरभाव दूर ठेवत पक्षातील तसेच पक्षविरोधक यांच्या सोबत चालत जाताना तिघांनीही एकच सूर आळवला, जय श्रीराम.

Story img Loader