वर्धा : अवघ्या क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन अखेर होणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव येथे या स्पर्धा रंगतील. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष असलेले विदर्भ केसरी खासदार रामदास तडस यांनी याचे सूतोवाच केले. नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या स्पर्धा घेण्याची तयारी सुरू झाली आहे. अधिकृत तारखा लवकरच घोषित होतील.
हेही वाचा : जुनी पेन्शन योजना लागू करणार; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन
मध्यंतरी राष्ट्रीय कुस्तीगीर संघाच्या हस्तक्षेपनंतर घोळ निर्माण झाला होता. आता मार्गी लागले आहे. अत्यंत मानाची अशी ही स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेत जिल्हा संघ पाठविण्यासाठी जिल्हा पातळीवर चाचणी सुरू झाली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबसाठी या झुंजी रंगणार आहेत.