वर्धा : पूर्वीपासून सेनेचे संपर्कप्रमुख वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याच्या घटना जिल्ह्यास नव्या नाहीत. आता सेनेची दोन शकले झाली. पण व्याधी कायम असल्याचे चित्र पुन्हा दिसून आले आहे.
सेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख म्हणून नीलेश धुमाळ यांची नियुक्ती झाली आहे. नियुक्ती पासूनच त्यांचा कारभार वादग्रस्त असल्याचा आरोप प्रमुख निष्ठावंत सेना नेते करीत आहे. त्यांची कार्यपद्धती जिल्ह्यातून पक्ष संपविणारी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलेला होवू द्या चर्चा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते राबले. त्यांचे परिश्रम सूरू असतांना संपर्क प्रमुख दुसरीकडे खानावळी झोडण्यात मशगुल होते.
हेही वाचा…‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या
समुद्रपूर येथील कार्यक्रमात ते तब्बल तीन तास उशीरा पोहचले. तर आर्वीत आयोजित सभा रद्द करण्याची आपत्ती आली. येथील सभेसाठी आलेले लोकसभा निवडणूक निरीक्षक सतीश हरडे यांना आल्या पावली परत जावे लागले. अनेक वर्षांपासून निष्ठेने त्यामुळे बहुसंख्य पदाधिकारी असंतोष व्यक्त करीत आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अपमानजनक वागणूक दिली जाते. आर्थिक व्यवहार करीत पदाधिकारी नेमले जात असल्याचे आरोप आहेच. आढावा बैठकीपूर्वी बहिष्कार टाकणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. आम्ही मातोश्रीचे निष्ठावंत सैनिक असून संघटना बळकट करण्यासाठी अविरत प्रयत्न लरीत आहे. मात्र, पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करण्याचे प्रकार सूरू आहे. धुमाळ यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास नाही. असे आरोप एका लेखी निवेदनातून करण्यात आले आहे.
हेही वाचा…यवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…
हे निवेदन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच अरविंद सावंत, अनिल देसाई, अरविंद नेरकर, प्रकाश वाघ यांना देण्यात आले आहे. या पत्रावर सहसंपर्क प्रमुख रविकांत बालपांडे, जिल्हाप्रमुख बाळा मिरपूरकर, जिल्हा संघटक भारत चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, विविध तालुका प्रमुख, माजी नगरसेवक, युवा सेना जिल्हाप्रमुख अभिनंदन मुनोत, काही शहर प्रमुख तसेच अन्य प्रमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहे.