वर्धा: एका युवतीच्या जीवावर उठणाऱ्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या समीर खान अश्रफ खान यास गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. तो बोरगाव मेघे येथील झाकीर हुसेन कॉलनीत राहतो.तर दुसरा आरोपी अल्पवयीन मुलगा असून तोच कार चालवीत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. २६ सप्टेंबरला ही घटना घडली होती.रात्री साडे सात वाजता श्रद्धा सुनील झोटिंग ही आपल्या साक्षी लोखंडे या मैत्रिणीसह आर्वी मार्गाने पायी चालली होती.त्याच वेळी वेगात असलेल्या एमएच ३२ सी ७२२५ या क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली. श्रद्धाला कारने १०० मिटर फरफटत नेले. अनिल फर्निचर या दुकानाजवळ कार थांबली. मात्र आरोपी पळून गेले. संतप्त लोकांनी कारची तोडफोड केली होती. जखमी श्रद्धास प्रथम सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सूरू आहे.
हेही वाचा : नागपूर : खंडणीखोर पोलीस कर्मचारी निलंबित
या घटनेची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार झाली. मात्र पोलिस घटनेचे गांभीर्य ओळखून तपास करीत नसल्याचा आरोप होत संताप व्यक्त करने सूरू झाले होते. शेवटी पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी प्रकरण हाती घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची खबर घेतली. त्यानंतर तपास वेगाने सूरू झाल्याचे म्हटल्या जाते. तसेच राजकीय दबाव असल्याची चर्चा सूरू झाली.मग कारचालकवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले. कारमध्ये तीन युवक असल्याचे सांगितल्या जाते. त्यापैकी एकास रात्री अटक करण्यात आली आहे.कारमध्ये युवती फसली असल्याचे लक्षात न आल्याने ती भर पावसात फरफटत गेली. त्यामुळे तिला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्यात. आता तपास करतांना मैत्रीण साक्षी तसेच परिसरातील भाजीवाले व उपस्थित नागरिक यांचे बयान घेण्यात आले आहे. मात्र घटना होऊन सहा दिवस उलटल्यावर आरोपीस अटक न झाल्याने संतप्त चर्चा सूरू झाली होती.सिसिटीव्ही कॅमेऱ्यात काही बाबी निदर्शनास आल्या होत्या . आरोपी दोन युवकांना ठाण्यात बोलावून सोडून दिल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे लगेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत निर्देश दिलेत. सुदैवाने कार मध्ये अडकलेल्या युवतीस नागरिकांनी बाहेर काढून त्वरित रुग्णालयात नेल्याने तिच्यावर तातडीचे उपचार सूरू झाले. ती आता सुखरूप असल्याचे म्हटल्या जाते.