वर्धा : बायोमासपासून विद्युत निर्मिती करणाऱ्या देवळी औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र विद्युत निगम प्रा.लि. या कारखान्यात अपघात घडला. चेन कव्हर मशीनमध्ये दबून फिटर दिनेश मोकडे याचा मृत्यू झाला.तसेच विक्रम तेलरांधे हा जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहे. ऑपरेशन व्यवस्थापकाच्या चुकीने हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे. दोन्ही कामगार हे चेन मशीनमध्ये पीन काढण्याचे काम करीत होते. याचवेळी व्यवस्थापकाने मशीन सुरू केल्याने त्यात दोन्ही कामगार दबल्या गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नक्षलींचा पुन्हा रक्तपात, तरुणाची गोळ्या घालून हत्या; महिनाभरात तीन हत्यांनी दक्षिण गडचिरोलीत दहशत

कामगार दिनेश हा मशीनमध्ये गुंडाळल्या गेल्याने त्याचा कंबरेपासूनचा भाग चेंदामेंदा झाला. सावंगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कामगार व आप्त वर्तुळात चांगलाच रोष आहे. या ठिकाणी कोणतेही सुरक्षा साहित्य पुरविल्या जात नसल्याचा आरोप होतो. दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha one died and one worker was injured after being crushed by the machine in devli industrial area pmd 64 css
Show comments