वर्धा : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज इथे खळबळजनक आरोप केला आहे. संघटनेची जाहीर सभा वर्ध्यात आयोजित करण्यात आली आहे. त्यास आंबेडकर संबोधित करणार असून त्यापूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते म्हणाले की भाजप व आरएसएस दोन्ही असे म्हणतात की आम्ही हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहोत. देशात बहुसंख्य पूर्णपणे हिंदू आहेत. मग धार्मिक राजकारण कश्यासाठी असा आमचा प्रश्न आहे. त्याचा खुलासा होत नाही. गत दहा वर्षात ज्या कारवाया झाल्या त्यातून हे इतिहासातील हे भांडण असल्याचे दिसते. संतांनी जी मांडणी केली ती व्यक्ती व सामूहिक स्वातंत्र्याची आहे. वैदिक धर्मातील जी सामाजिक मांडणी आहे ती व्यक्तिस्वातंत्र्य तसेच सहजीवन नाकारणारी आहे.यातून संतांच्या विचारावर आधारित जे संविधान आहे त्याविरोधात भाजप व आरएसएस या ठिकाणी दिसते.

हेही वाचा…गोंदिया : भाविकांची अनियंत्रित कार कालव्यात कोसळली; तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

उद्याचे संविधान कसे असेल याची ते चर्चा करीत नाही. पण जे सूचक वक्तव्ये येतात त्यातून हिटलरशाहीस पुरुस्कृत करणारी घटना असेल. आम्ही सांगू तसे करा. आम्ही सांगतो तसेच करा. तोच उद्याच्या नवीन घटनेचा पाया असेल. ही रचना येतांना आपल्याला विरोध होवू नये म्हणून अत्यंत सावध, पद्धतशीरपणे, जाणीवपूर्वक हिटलरशाहिस मानणार नाही असे देशाबाहेर कसे अशी परिस्थिती निर्माण केल्या गेली.

१९५० ते २०१३ पर्यंत ७ हजार २०० कुटुंबे देश सोडून गेली होती.पण २०१४ ते २०२४ म्हणजे आतापर्यंत देश सोडून जाणाऱ्या कुटुंबाची, तेही हिंदू कुटुंबाची संख्या २४ लाख झाली आहे. ज्यांची किमान मालमत्ता ५० कोटीची आहे अश्या या २४ लाख कुटुंबाना देश सोडायला लावलं. त्यांना मजबूर करण्यात आलं. हा देश सोडून जाणारा वर्ग संत परंपरेला मानणारा होता. परिस्थिती अशी निर्माण केल्या गेली की त्यांना देश सोडावा लागला. त्यांनीही त्यांच्या पुढील पिढीची चिंता म्हणून देश सोडला. डागाळलेले जीवन जगण्यापेक्षा देश सोडलेला बरं, असा विचार त्यांनी केला. त्यांना इडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा यंत्रणांची भीती घातली, असा घणाघात आंबेडकर यांनी केला. येत्या निवडणुकीत चारशे पारची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर बोलतांना ते म्हणाले की भाजप दीडशेपार पण जाणार नाही. भीतीपोटी ते असा अहंकार व्यक्त करीत आहे. पराभव होण्याची लक्षणे दिसून येत असल्याने ते स्वतःची समजूत काढत आहे. स्वतःच घर शाबूत राहावे म्हणून इतरांची घरे फोडत आहे.

हेही वाचा…Video : टायगर फॅमीलीची धमाल मस्ती पाहिलीय का? नाही, तर मग ताडोबाच्या जंगलातील वीरा आणि बछड्यांचा हा व्हिडिओ पाहाच…

मनोज जरांगे यांच्या उपोषण संदर्भात मी सरकारला काळजी घेण्याचा दिलेला सल्ला हा काही अनुचित घडू नये, या भावनेतून दिला आहे. एकवेळ घराणेशाही चालेल पण गुन्हेगारीकरण नको, या मताचा मी आहे. पण हिंदूंच्याच देशात हिंदूच देश सोडत आहे, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha prakash ambedkar criticizes bjp claims 24 lakh hindus left country under their rule pmd 64 psg
Show comments