वर्धा : २८ डिसेंबर रोजी नागपूरात होणाऱ्या काँग्रेसच्या ‘हम तय्यार है’ या महारॅली साठी जोरदार तयारी सुरू आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा रोज आढावा घेतल्या जात आहे. हे संमेलन यशस्वी व्हावे म्हणून मोठी गर्दी जमविण्यावर भर दिल्या जाणार. कोणता नेता त्यात किती योगदान देणार, याची तपासणी आधीच केल्या जात आहे. जिल्हा समन्वयक म्हणून नेमलेल्या व्यक्तीवर विशेष जबाबदारी आहे.
हेही वाचा : हरविलेल्या ८५८ मुलांची ‘घरवापसी’! कौटुंबिक कलहाने…
ब्लॉक मधून नागपूरात येणाऱ्या वाहनांची क्रमांकासह यादी तयार करायची आहे. त्यासाठी एक जबाबदार पदाधिकारी नेमल्या जाणार आहे. वाहनाचा मार्ग, वाहनांची फोटोंसह ब्लॉक निहाय यादी, त्यावर ‘हम तय्यार है’चा लोगो, स्थानिक काँग्रेस समितीचे नाव यासह माहिती प्रदेश समितीकडे पाठवायची आहे. या सर्व गाड्या रवाना होईपर्यंत निरीक्षकास विधानसभा क्षेत्र सोडता येणार नाही.