वर्धा : वर्धा-नागपूर रेल्वे मार्गावरील तुळजापूर येथील रहिवासी गेल्या पाच वर्षांपासून विविध समस्यांसाठी आंदोलन करीत आहे. त्यात मेल व अन्य काही गाड्यांच्या थांब्याबाबत ते संवेदनशील झाले होते. १३ डिसेंबर रोजी झालेले जनतेचे आंदोलन रेल खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग आणणारे ठरले. १९ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत ठाम खात्री देण्यात आली. येत्या तीन दिवसात मेल गाडी सुरू होईल, अशी हमी अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक पी.एस. खैरकार यांनी दिली आहे.
हेही वाचा : मंत्री लोढांनी दर्शवली राजीनाम्याची तयारी, परिषदेत काय घडले?
या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, आंदोलन नेते रामकिशोर रामाजी शिगणधुपे, नीरज खांदेवाले, अॅड. सन्याल, अरुण गावंडे, आशिष इंझनार,मंगेश तिजारे,प्रवीण चाफ्ले, अजय राजूरकर,सुनील जयस्वाल,स्वप्नील ठाकूर,लक्ष्मण राऊत, राजू वैद्य तसेच रेल्वेचे आशुतोष श्रीवास्तव,मनोज कुमार,अमित व अन्य उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या आंदोलनात खासदार रामदास तडस यांनी पुढाकार घेत रेल्वे मंत्र्यांची भेट घेवून तुळजापूर व परिसरातील पंचवीस गावाच्या भावना कळविल्या होत्या.या मार्गावर अनेक समस्या आहेत.आता त्या सोडवाव्या अशी अपेक्षा शिगनधुपे यांनी व्यक्त केली.