वर्धा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथे संपन्न झाला. यात पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी महायुतीस गंभीर इशारा देऊन टाकला. ते, म्हणाले की आपला पक्ष महाराष्ट्रातील महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे ६० जागाची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मागणी करण्यात आली आहे. सन्मानजनक जागा नं मिळाल्यास पूर्ण २८८ जागा लढण्याची तयारी सुरू आहे. नवे मित्र शोधण्याची गरज नाही, असा खणखणीत इशारा जानकर यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या या इशाऱ्यामुळे महायुतीत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. गाव तिथे शाखा बांधा. फलक लावा. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत, नगर पालिका निवडणूक लढवायची असून चारही विधानसभा क्षेत्रात उमेदवार देणार. त्यासाठी सक्षम उमेदवार शोधा. आपले सर्व उमेदवार निवडून येणार नाहीत. पण महायुतीस आपली ताकद दिसेल. देशातील सात राज्यात रासपचे मोठे काम आहे.त्या राज्यात लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. सन्मानजनक मते मिळाली. महाराष्ट्रात आपले ७८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. काही जिल्ह्यात महानगर पालिका, नगर पालिका व पंचायत सदस्य आहेत. यापुढे केवळ फलकावर फोटो नकोत. ओबीसी, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय यांच्यासाठी पक्षाचे दार उघडे आहे. याचा पक्षात मान सन्मान मिळतो. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी अहंकार बाळगत नाही. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पालख्या वाहणे सोडून द्या. मी स्वतः विधानसभा निवडणूक लढणार नाही. पक्षाचा उमेदवार ज्या मतदारसंघात उभा आहे, तिथे प्रचारास जाणार. एक नाही तर तीन सभा घेईल. कामाला लागा. केवळ ६० दिवस शिल्लक आहे. वेळेवर धावपळ नकोच, असेही जानकर म्हणाले.

हेही वाचा : गडचिरोलीवर घोंगावणारे महापुराचे संकट टळले? मेडिगड्डाचे ८५ दरवाजे उघडे असल्याने थेट तेलंगणा सरकारला…

संघटक राजू गोरडे यांनी राजकीय स्थिती मंडळी. लोकसंख्येच्या तुलनेत विदर्भात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे प्रा. तौसिफ़ शेख म्हणाले. प्रा. राजेंद्र बाणमारे व अरुण लांबाडे यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. नितीन सुळे, पद्माकर कांबळे, राजू भगत, सचिन डहाके, नजीर शेख, नागोराव सेवासे, प्रताप पाटील, धनराज लोखंडे, अंजली मजिठीया, अंजली शिरपूरकर, साक्षी गिरडकर, रामेश्वर लांडे, सुभाष कडे, चंद्रशेखर भेंडे यांनी संयोजन केले. पक्षाची महिला, शेतकरी, युवा आघाडी स्थापन करण्याचा निर्णय या प्रसंगी घेण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha rsp leader mahadev jankar warns mahayuti to contest on 288 lok sabha seats if 60 seats not given to his party pmd 64 css