वर्धा : येथील बजाज वाचनालयात कुंदा ठोंबरे स्मृती कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ते म्हणाले की, निसर्गाने निर्मितावस्थेत प्रदान केलेल्या गुणधर्माचे पालन करणे हा मानवधर्म आहे. तसे वागणारा, वर्तन ठेवणारा पृथ्वीतलावरील प्रत्येक माणूस हा हिंदू आहे. श्रीराम व श्रीकृष्ण हे धर्म संस्थापनेसाठी युद्धही करतात. हाच भारताचा इतिहास. आम्हाला मात्र इतिहासाचे विस्मरण झाले आहे. ज्या राष्ट्राला आपल्या इतिहासाचे विस्मरण होते, त्या राष्ट्राचा भूगोल पण बिघडतो आणि विकृतीकरण सुरू होते, असे भाष्य पोंक्षे यांनी केले.
हेही वाचा – वर्धा : हद्दच झाली! नळाच्या पाण्यातून कधी मृत पिल्लू, तर कधी…
हेही वाचा – उत्तरेकडील राज्यात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र उन्हाचे चटके
या प्रसंगी संजय जोग, अरुंधती ठोंबरे, प्रा. श्याम देशपांडे, मकरंद उमाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अरुंधती ठोंबरे यांनी आईच्या आठवणीस उजाळा दिला. केतकी कुलकर्णी हिने प्रार्थना सादर केली. मंगेश परसोडकर व नरेंद्र माहुलकर यांनी संगीत साथ दिली. अतुल रासपायले यांनी आभार मानले.