वर्धा : महिलांसाठी विशेष उपक्रम सूरू करीत त्या माध्यमातून त्यांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न केल्या जातो. त्यांचा समाज जीवनातील सहभाग अधिक वाढविण्याचा उद्देश त्यामागे असतो, असे म्हटल्या जाते. आता शिक्षण क्षेत्रात पण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम आहेत. त्यात आता खासकरून महिला प्राध्यापक वर्गासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक माध्यम उपलब्ध करून दिले आहे. आयोगाने ‘ शि रिसर्च नेटवर्क इन इंडिया ‘ अर्थात शेरणी हे नेटवर्क सूरू केले आहे. यूजीसी – आयएनएफएलआयबीएनईटी तर्फे हे नेटवर्क पुरुस्कृत झाले आहे. महिला प्राध्यापकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य निर्माण करणे तसेच कार्य आणि संशोधन याविषयी अनुभवांची देवाणघेवाण करण्याचा उद्देश ठेवून हे नेटवर्क स्थापन करण्यात आले आहे.
हेही वाचा : धक्कादायक! खेळतांना १० वर्षीय मुलाला मांजर चावली, काही तासांतच…
त्या माध्यमातून ८१ हजार ८१८ नोंदणीकृत महिला शास्त्रज्ञ तसेच इतर क्षेत्रातील महिला शैक्षणिक सदस्यांना जोडल्या जाणार आहे. या सोबतच सदर नेटवर्क मध्ये ६ लाख ७५ हजार ३१३ प्रकाशने आणि ११ हजार ५४३ पेटंटचा समावेश राहणार आहे. त्याच्या मदतीने विद्यार्थी संपर्कात राहतील. त्यामुळे नव्या गोष्टी शिकायला मिळतील. तसेच शास्त्रज्ञाशी बोलून सविस्तर माहिती मिळवू शकतील. आयोगाचे अध्यक्ष प्रा. जगदीश कुमार म्हणतात की आयोग महिला शास्त्रज्ञ आणि शिक्षकांच्या कामगिरीसाठी समान प्रतिनिधित्व आणि एक्स्पोजर याची हमी देण्याचा मानस ठेवते.यां नेटवर्कच्या माध्यमातून महिला शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापकांच्या पुढील पिढीला प्रेरणा देण्याचे काम केल्या जाईल. ज्यामुळे यां शिक्षण क्षेत्रातील महिलांचा सहभाग अधिक वाढू शकेल. असा विश्वास त्यांनी आयोगाच्या संकेतस्थळावर व्यक्त केला आहे.