वर्धा : विधानसभा निवडणुकीत यश मिळणार, असे गृहीत धरून महाविकास आघाडीचे नेते बाह्या सरसावून बोलू लागले आहे. त्यातूनच या आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व सेना ठाकरे गटाचे ईच्छुक कामाला लागल्याचे चित्र आहे. वादही होवू लागले आहे. जिल्ह्यात वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यातूनच वाद सूरू झाले आहेत. आर्वी व हिंगणघाट राष्ट्रवादीकडे तर देवळी व वर्धा काँग्रेस कडे राहणार अशी उघड भाषा होत आहे. असे स्थानिक पातळीवर नेत्यांनी केलेले वाटप लोकसत्तातून उघड झाले. मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाचा उल्लेख पण होत नसल्याचे पाहून सेना नेते संतापले. १९८७ पासून मातोश्री निष्ठावंत म्हणून राजेंद्र खुपसरे यांची ओळख दिल्या जाते. ते चार वेळा नगरसेवक तसेच एकदा बाजार समिती संचालक राहले. माजी आमदार अशोक शिंदे यांनी मातोश्रीची साथ सोडल्यानंतर त्याचे विश्वासू राहलेले खुपसरे मात्र मातोश्री सोबतच जुळून आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा