वर्धा : संपत्तीचा लोभ भल्याभल्यांना सुटत नाही. त्यात आता वडिलांच्या संपत्तीत लग्न झालेल्या मुलींना पण हिस्सा मिळण्याची झालेली तरतूद सासर माहेर यात दुरावा निर्माण करणारी ठरत असल्याची अनेक उदाहरणे पुढे येत आहे. समुद्रपूर येथील रमेश डगवार यांचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलीला व एक मुलगा. वडिलांच्या मृत्यूनंतर बहीण भावात वाद सूरू झाले.गावातच डगवार परिवाराचे वडिलोपार्जित भव्य कॉम्प्लेक्स आहे. त्यावरू भाऊ राजू डगवार याचा चारही बहिणीसोबत वाद सूरू झाला होता. घटनेच्या दिवशी शुक्रवारी नागपूर येथील जोशीनगरात राहणाऱ्या ज्येष्ठ भगिनी वैशाली सुभाष कुरवाळे या घरून मॉर्निंग वॉक साठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र त्या थेट माहेरी समुद्रपूर येथे भावाच्या घरी पोहचल्या. वाद झाला. संतप्त वैशाली यांनी घराच्या अंगणात असलेल्या विहिरीत उडी घेतली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : ‘यांना’ मिळाली इलेक्ट्रिक वाहन खरेदीपासून मुभा…’हे’ आहे विशेष कारण…

Atul Subhash Suicide Note last 12 wishesh
Atul Subhash Suicide: अतुल सुभाष यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक दावे, शेवटच्या १२ इच्छा व्यक्त करताना न्यायव्यवस्थेवर केली टीका
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

मृत महिलेचे पती सुभाष कुरवाळे तसेच मुलाने वैशाली हिच्या मृत्यूस भाऊ राजू डगवार, त्याची पत्नी तसेच राजूचे सासरे जबाबदार असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली. त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती घेऊन ठाणेदार संतोष शेगावकर घटनास्थळी पोहचले. मृतदेह विहिरीतून काढून पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. रुग्णालयात नातेवाईकांचा संताप वाढू लागला होता. परिस्थिती चिघळू नये म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित हे घटनास्थळी दाखल झाले.भाऊ व भावूजयीस अटक करण्यात आली.

Story img Loader