वर्धा : संपत्तीचा लोभ भल्याभल्यांना सुटत नाही. त्यात आता वडिलांच्या संपत्तीत लग्न झालेल्या मुलींना पण हिस्सा मिळण्याची झालेली तरतूद सासर माहेर यात दुरावा निर्माण करणारी ठरत असल्याची अनेक उदाहरणे पुढे येत आहे. समुद्रपूर येथील रमेश डगवार यांचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलीला व एक मुलगा. वडिलांच्या मृत्यूनंतर बहीण भावात वाद सूरू झाले.गावातच डगवार परिवाराचे वडिलोपार्जित भव्य कॉम्प्लेक्स आहे. त्यावरू भाऊ राजू डगवार याचा चारही बहिणीसोबत वाद सूरू झाला होता. घटनेच्या दिवशी शुक्रवारी नागपूर येथील जोशीनगरात राहणाऱ्या ज्येष्ठ भगिनी वैशाली सुभाष कुरवाळे या घरून मॉर्निंग वॉक साठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र त्या थेट माहेरी समुद्रपूर येथे भावाच्या घरी पोहचल्या. वाद झाला. संतप्त वैशाली यांनी घराच्या अंगणात असलेल्या विहिरीत उडी घेतली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा