वर्धा : वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा किंवा प्रतवारी ठरविण्यात आजीमाजी विद्यार्थ्यांचे मत नोंदविण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे. पुढील वर्षापासून देशातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतवारी (रेटिंग) ठरविल्या जाणार आहे. वैद्यकीय आयोगाने रेटिंगची जबाबदारी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडे सोपविली आहे. यात विद्यमान तसेच माजी विद्यार्थ्यांच्या फिडबँकवर महाविद्यालयाचा दर्जा अवलंबून असेल. येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.ललित वाघमारे यांनी यास दुजोरा दिला. वैद्यकीय मुल्यांकन परिषद प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील १०० माजी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेईल. तसेच सध्या शिकणाऱ्या २५ टक्के विद्यार्थ्यांची निवड करून अभिप्राय घेतला जाईल.
हेही वाचा : ज्येष्ठांच्या धाव स्पर्धेतील ‘त्या’ घटनेची पुन्हा आठवण, काय घडले?
या सर्व विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे वैद्यकीय महाविद्यालयाचे रेटिंग ठरविणार. यापुढे देशातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये हे त्यांच्या रेटिंगवरून ओळखल्या जाणार असल्याचे म्हटल्या जाते. चांगला दर्जा मिळणाऱ्या महाविद्यालयाची प्रतिमा उंचावून त्यांना लाभच मिळेल. तर खराब दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांवर कारवाई पण होवू शकते. २०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून असे मुल्यांकन आणि मानांकन सुरू होईल. रेटिंगसाठी तयार केलेल्या निकषांमध्ये अध्यापन विभाग, रूग्णालये आणि वसतीगृहे, अभ्यासक्रम, संशोधन आणि प्रयोगशाळा सुविधांमध्ये सुरक्षा उपायांची अंमलबजावणी तसेच अन्य बाबींचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या वसतीगृहात पुरेशा मनोरंजन सोयी, भोजन आणि २४ तास सुरक्षा सुविधा आहे की नाही, हे सुध्दा तपासल्या जाणार. कुलगुरू डॉ.ललित वाघमारे म्हणाले की असा निर्णय अपेक्षीत आहे. आजीमाजी विद्यार्थ्यांकडून फिडबॅक घेणार हे खरेच. पण तो एकमेव निकष राहणार नाही. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सध्या कुठे कार्यरत आहे. महाविद्यालयास विदेशातून निधीची मदत होते काय, संशोधनाचा दर्जा व मिळालेले पेटंट असे दहा बारा निकष असल्याची माहिती आहे.