वर्धा : शहरालगत असलेल्या पिपरी मेघे गावात आज रक्षाबंधनाच्या दिवशीच शोककळा पसरली. मंदिरात झेंडा लावायला गेलेल्या गावातील तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अशोक सावरकर, बाळू शेर, सुरेश झिले अशी मृतांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… खबरदार, रामजन्मभूमीबाबत वादग्रस्त बोलाल तर…! विहिंपचा उद्धव ठाकरे गटाला थेट इशारा…..

हेही वाचा… अकोल्यातील सांस्कृतिक भवन लोकार्पणापूर्वीच अडगळीत; अपूर्ण कामामुळे इमारत पडून

गावातील तुळजा भवानी मंदिरात हे तिघे नेहमीप्रमाणे पाहणीसाठी गेले होते. मंदिरातील कळसावर झेंडा लावायला ते २५ फूट उंचीच्या खांबावर चढले. मात्र, त्यांचा तोल गेला. लागूनच असलेल्या ३३ केव्हीच्या विजेच्या तारांचा त्यांना स्पर्श झाला. विजेचा जबर धक्का बसल्याने ते मंदिराच्या शेडवर आदळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती सरपंच अजय गौळकर यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha three youths died due to electric shock while putting the flag on top of mandir on rakshabandhan day pmd 64 asj