वर्धा : गत काही वर्षात वन्य प्राणी आणि त्यांचा गावालगतचा मुक्त संचार शेतकऱ्यांसाठी जीव मुठीत घेऊन जगण्यास भाग पाडणारा ठरत आहे. प्रामुख्याने वाघ, बिबट, अस्वल यांचा वावर गावाकऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना घडल्या आहे. आता समुद्रपूर तालुक्यातील गिरड शिवारात एक वाघीण व तिचे तीन शावक यांचा मुक्त संचार सूरू आहे. शेत शिवारात गायीवर हल्ले झाले आहेत. खुरसापार ते मोहगाव दरम्यान या कुटुंबाचा संचार असल्याचे सांगण्यात येते. गायीवर हल्ला झाल्यानंतर तीन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. त्यात वाघीण व तीन शावक कैद झाले. आता २० कॅमेरे लावून नजर ठेवल्या जात आहे. या भागात काही शेतकरी जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून विजेचा पुरवठा सूरू ठेवतात. त्याचा झटका वाघीनीस बसू शकतो. म्हणून ते टाळण्यासाठी वन खात्याने वीज कंपनीस रात्रीच्या वेळी वीज पुरवठा करू नये असे पत्र दिले आहे. हा परिसर जोपर्यंत वाघीण सोडून जात नाही तोवर पुरवठा बंद राहणार.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा