वर्धा : १६ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या संविधान चौकात इशारा आंदोलन, १७ ते २३ ऑक्टोबरला सर्व जिल्हा स्तरावर लेखणी बंद आंदोलन व सरकारने दखल घेतली नाही तर २४ ऑक्टोबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन या संघटनेने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : बालिकेवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, उमरखेडमध्ये रास्ता रोको

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी नर्सेस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी कर्मचारी यांचा हा प्रश्न आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी २० मार्चच्या सभेत या सर्वांचे समायोजन करण्याचे तसेच वेतनवाढ देण्याची हमी दिली होती, असे राज्य संघटक दिलीप उटाणे नमूद करतात. परंतू पाच महिने लोटूनही काहीच अंमल झाला नाही. परिणामी तीव्र असंतोष पसरला आहे. आंदोलन झाल्यास उद्भवलेल्या परिस्थितीस संघटना जबाबदार राहणार नाही. म्हणून शासनाने तात्काळ दखल घ्यावी किंवा लेखी स्वरूपात कळवावे, असा इशारा देण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha union of nurses which employed on contract basis warns of statewide agitation for various demands including salary increment pmd 64 css
Show comments