वर्धा : मनुष्य असो की वन्यप्राणी . प्राणीमात्रात भावनांचा कल्लोळ असतोच. मूक प्राणी पण वेदना, माया, लळा व तत्सम भावना प्रदर्शित करतातंच. बोर व्याघ्र प्रकल्प हा जैव विविधतेने नटलेला आगळा वेगळा असा असल्याचे वन अधिकारी सांगतात. म्हणजे प्राणी, वृक्ष, पक्षी यांचे बोरमधील वैविध्य हे ताडोबा, पेंच, मेळघाट यापेक्षा संपन्न स्वरूपात बघायला मिळते. वाघ, बिबटच नव्हे तर अस्वल, चितळ, सांबर, कळविट, मोर, लांडगे, कोल्हे व अन्य प्राणी तसेच दुर्मिळ वृक्ष संपदा इथेच बघता येणार, अशी खात्री वन्यप्रेमी देतात.
देशातील सर्वात लहान व विमानतळपासून सर्वात जवळ अश्या बोर प्रकल्पत सध्या पर्यटकांची झुंबड उडाली आहे. त्यात मादा अस्वल व तिची दोन पिल्ले यांचा लपंडाव विशेष खुणावतो. भाजप नेते प्रणव जोशी हे जंगल भ्रमंतीसाठी परिचित आहे. पण ते म्हणतात अस्वल व तिच्या पिल्लांची मस्ती एक दुर्मिळ असे सायटिंग ठरले. मादा अस्वल एकटीच फिरत असल्याचे दिसून आल्याने ते थांबले. तेव्हा अचानक तिची दोन पिल्ले धावत आली. आईच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करू लागले. पण आईचा नकार आणि यांचा आई, कडेवर घे नां, असा हट्ट. शेवटी दोनही पिल्लं पाठीवर चढलेच. काही अंतरावर मग मादा झाडावर चढत गेली. टोकावर पोहचली. पिल्लं पण मग आईच्या मागोमाग झाडावर चढत गेली.
हे दृष्य दुर्मिळ असेच. मोबाईल बाळगता येत नसल्याने पूर्ण हालचाल टिपता आली नाही. कॅमेरात शक्य ते टिपले, असे प्रणव जोशी सांगतात. लाखोत एक असा हा अनुभव ठरला. कॅमेराची व्हिडिओ बटण चटकन लागली असती तर लोकांना एक अमिट ठेवा देता आला असता, अशी खंत ते व्यक्त करतात. काळ्या रंगाच्या या मादा अस्वलीस एक तांबड्या व एक काळ्या रंगाचे असे दोन पिल्लं आहेत.
देशातील सर्वात लहान व विमानतळपासून सर्वात जवळ अश्या बोर प्रकल्पात सध्या पर्यटकांची झुंबड उडाली आहे. त्यात मादा अस्वल व तिची दोन पिल्ले यांचा लपंडाव विशेष खुणावतो. प्रणव जोशी यांनी पिल्लांना घेऊन जात असलेल्या मादा अस्वलाला कॅमेऱ्यात कैद केले. pic.twitter.com/9IgHo03TwS
— LoksattaLive (@LoksattaLive) April 22, 2025
बोर अभयारण्यात सध्या अस्वलिंचा धुमाकूळ सूरू आहे. महिन्यापूर्वी एक अस्वल जंगलातील गावातल्या हनुमान मंदिरात दडून तेलाचा हट्ट धरून बसले होते. बोर अरण्याचा पर्यटकांच्या दृष्टीने विकास करण्याचे प्रयत्न सूरू आहे. ईथे सोमवारला बंद असतो. तो ताडोबा प्रमाणे गुरुवारी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच रात्रीची राहुटी करण्यात यावी म्हणून लॉग हट बांधण्याचे नियोजित आहे. पाच गावांचे पुनर्वसन करण्याचे मान्य झाले असल्याने बोरचा अधिक विस्तार शक्य होणार असल्याचे सांगितल्या जाते.