वाशीम : सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. गाव, वाड्या वस्त्यातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र यापेक्षा गंभीर परिस्थिती जंगलात निर्माण झाली आहे. जंगली भागातील नद्या, ओढे कोरडी पडल्याने मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत असल्याने पाण्यासाठी जंगलातील प्राण्याच्या अपघाताच्या घटना समोर येत आहेत.
हेही वाचा : लग्नाच्या वरातीत आक्षेपार्ह गाणे; दोन गट भिडले, तिघे जखमी, चार ताब्यात
उन्हाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाई उद्भवत आहे. तसेच जंगतील ओढे, नद्या चे पाणी आटले आहे. त्यामुळे जंगलातील प्राण्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्य लागत आहे. त्यामुळे प्राणी पाण्याच्या शोधात विहारीं जवळ येत आहेत. मात्र बहुतांश विहरिंना कठडे नसल्याने त्यांचा तोल जावून विहरित पडून जखमी होत आहेत. तसेच पाण्याच्या शोधात असलेल्या वन्य प्राण्याच्या शिकारी होत आहेत. अशी विदारक स्थिती असताना वन विभाग मात्र उदासीन दिसत आहे. तांडळी शेत शिवारात वीस फूट खोल विहरीत एक निलगाय पडल्याची घटना घडली तर मानोरा तालुक्यातील भुली गावात एक बिबट पन्नास फूट खोल विहरीत कोसळले. वन विभागातील कर्मचारी व वन्यजीव प्रेमीच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात यश आले असले तरी कडक उन्हात जंगलातील वन्य प्राण्यांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.