वाशीम : शहरातील विनायक नगर येथिल रहिवासी तथा पोलीस विभागात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी संतोष रमेश चव्हाण यांच्या घरी चोरी झाल्याची घटना आज पहाटे २ वाजेदरम्यान उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार वाशीम शहरातील विनायक नगर येथे संतोष रमेश चव्हाण राहतात. ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. मात्र आज पहाटे त्यांच्या घरी चोरी झाल्याचा अंदाज शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नागपूर : कोट्यवधींची संपत्ती जमविलेल्या काँग्रेस खासदार धीरज साहूंविरोधात भाजप महिला आघाडीचे आंदोलन

चव्हाण यांच्या घरातून चोरट्यांनी सोने, दागिन्यांसह २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती व्यक्त केली जात आहे. चोरट्यानी चक्क पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरीच चोरी केल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In washim at vinayaknagar theft at police s home of rupees 2 lakhs 86 thousand pbk 85 css