वाशीम : कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले होते. त्यांच्यावर आज वाशीम येथील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे काल शुक्रवारी मुंबई येथे दिर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव मुंबई येथून एअर ॲम्बुलन्सने रात्री उशीरा अकोला इथे न उतरवता नागपूर येथे उतरविण्यात आले. तेथून ॲम्बुलन्सद्वारे समृद्धी महामार्गावरून कारंजा येथे त्यांच्या मतदार संघात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

हेही वाचा : जावयाच्या डोळ्यात मिरपूड टाकून बॅटने बेदम मारहाण! सासुविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल; शेगाव तालुक्यातील घटना

आज शनिवारी वाशीम येथील जवाहर कॉलनी मधील त्यांच्या घरी सकाळ पासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या घरून निघालेली अंत्ययात्रा शहरातील पद्मतिर्थ मोक्षधाम येथे पोहचली. यावेळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा ग्यायक पाटणी यांनी राजेंद्र पाटणी यांच्या चितेला मुखाग्नी दिला. तर प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उप विभागीय अधिकारी वैशाली देवकर, माजी मंत्री संजय कुटे, गुलाबराव गावंडे, संजय देशमुख, अंतराव देशमुख, लखन मलिक, आमदार अमित झनक, रणधीर सावरकर, आकाश फुंडकर, तानाजी मुटकुळे, यासह आजी माजी आमदार, विविध पक्षातील पदाधिकारी, भाजप चे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शोक व्यक्त केला. तर मोठया संख्येने उपस्थित असलेल्या जनतेनी त्यांना साश्रू नयनानी अखेरचा निरोप दिला.

Story img Loader