वाशीम : मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज १३ जुलै रोजी पंचायत समिती मध्येच विद्यार्थी दाखल झाले. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत येथेच शाळा सुरू करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने घेतल्याने एकच धांदल उडाली.
दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेची स्थिती खालावत चालली आहे. जिल्ह्यातील अनेक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अनेक पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करीत आहेत. मात्र, सरकारच्या उदासीन धोरणामुळे गोर गरीब विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळखुटा येथे सातवीपर्यंत शाळा आहे. विद्यार्थी संख्याही बऱ्यापैकी आहे. परंतु, येथे केवळ तीन शिक्षक आहेत. त्यापैकी एक शिक्षक सुट्टीवर असतो. त्यामुळे प्रत्यक्ष केवळ दोन शिक्षक उपलब्ध असतात. त्यामुळे येथे शिक्षक देण्याची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज १३ जुलै रोजी शाळा व्यवस्थापन समितीने चक्क पंचायत समितीमध्येच विद्यार्थी दाखल करून जोपर्यत शिक्षक मिळत नाही. तोपर्यंत येथेच शाळा सुरू करावी, अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे.
हेही वाचा – वर्धा : आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन होणार २४ तासांत जमा, मिळणार ‘इतके’ कोटी रुपये
जिल्हा परिषद शाळेची स्थिती बिकट
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची स्थिती खालावत चालली असून अनेक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. मात्र, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकामधून होत आहे.