वाशीम : तालुक्यातील अनसिंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोंडा येथील एका विवाहित तरूणीसह दोन तरूणी १३ जुलै २०२३ च्या दुपारी दोन वाजतापासून गावातून फरार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने अनसिंग परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणात मुली विक्री करणाऱ्या टोळीचा संशय व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोंडा येथील गंगाबाई एकनाथ खंडागळे यांनी अनसिंग पोलीस ठाण्यात १३ जुलै २०२३ रोजी रात्री दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांची सून साक्षी अविनाश खंडागळे १८ वर्ष, निकीता संतोष मोरे २० वर्ष, आणि कोमल बाळू तायडे १६ वर्ष, या तिघीही १३ जुलै २०२३ रोजी दुपारी दोन वाजता घरून संडासला जातो म्हणून गेल्या होत्या. त्या तिघीही त्या दिवशी रात्री पर्यंत घरी परत आल्या नाहीत. गावामध्ये व परिसरामध्ये त्यांचा शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत. या प्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची सोंडा गावामध्ये उलट सुलट चर्चा आहे.

हेही वाचा… मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात गुन्ह्यांचा उतरता आलेख, २८ टक्के गुन्हे घटले; प्रवाशांमधील जनजागृतीचा सकारात्मक परिणाम

हेही वाचा… नागपूर: टोमॅटोची दरवाढ आणखी काही महिने, काय आहे विक्रेत्यांचा दावा ?

फरार झालेल्या तिघीही सोंडा गावातून पाऊलवाटेने शेलु बुद्रुक येथे गेल्यात.नंतर त्या आँटोमध्ये बसून जवळच असलेल्या पुसद तालुक्यातील पन्हाळा फाट्यावर उतरल्यात. नंतर पुसदकडे गेल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा संबंध एखाद्या मुली विक्री करणा—या रॅकेटशी संबंध असल्याचीही सोंडा व परिसरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार आनंद वागतकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मस्के करत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In washim district two young women and married women are missing pbk 85 asj
Show comments