वाशीम : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा वाशीम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बहुतांश ठिकाणी गहू, हरभरा काढणीला आलेला असताना अवकाळी पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वाशीम जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवार २५ फेब्रुवारी ते मंगळवार २७ फेब्रुवारी दरम्यान विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा काढणीला आलेला असताना अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : विश्लेषण : नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवरील निलंबन कारवाईची कारणे काय? 

तीन दिवसांचा येलो अलर्ट

वाशीम जिल्ह्यात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे. या दरम्यान अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. यामुळे शेतकऱ्यांची कापून टाकलेला गहू, हरभरा जमा करण्याची लगबग वाढली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In washim district yellow alert given chances of unseasonal rain farmers worried pbk 85 css