वाशिम : आज देशभरासह वाशिममध्येही ईद-उल-अज़हा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदची नमाज इदगाहवर अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लीम समाज बांधवांची ईद-उल-अज़हा म्हणजे बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरम्यान आज शहरालगत असलेल्या ईदगाहवर ईद उल अज़हाची नमाज सकाळी ९ वाजता अदा करून देशामध्ये शांतता रहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… काय सांगता! लायसन्स बनवायला आरटीओत गेला अन् कार गमावून बसला…

हेही वाचा… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वर्धा दौरा रद्द, वादाची बाब कुलगुरूंनी फेटाळली

ईदची नमाज अदा केल्यावर मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या गळा भेटी घेऊन इदगाहवर ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे ,पोलीस उपअधीक्षक सुनील कुमार पुजारी, परीविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक अमर मोहिते यांनीही मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्यने ईदची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव ईदगाहवर जमा झाले होते. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In washim eid ul adha celebrated with great enthusiasm pbk 85 asj
Show comments