वाशीम : नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, खुल्या बाजारात पडलेले शेतमालाचे भाव आणि कर्जाचा बोझा, याला कंटाळून एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केली. तेजस गजानन आळे, असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तो कारंजा तालुक्यातील बेलखेड येथील रहिवासी होता. बेलखेड येथील कल्पना गजानन आळे यांच्याकडे चार एकर एवढी शेती असून त्यांना दोन मुलं आहेत. त्यातील लहान मुलगा तेजस याने १९ जानेवारी रोजी आपल्या शेतात कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून विषारी द्रव्य प्राशन केले. कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्याला उपचारासाठी अमरावती येथील ईर्वीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना आज, रविवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : २५ हजार दिवे, रोषणाई, ६ हजार किलो रामहलवा; कोराडी देवी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी

वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आई कल्पना आळे कुटुंबाचा गाडा हाकत होत्या. अशातच आता मुलानेही आत्महत्या केल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आडे यांच्या नावे ४९ हजार रुपयांचे भारतीय स्टेट बँकेच्या कामरगाव शाखेचे पीक कर्ज आहे, तर २२ हजार रुपयांचे टीव्हीएस फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अमरावती पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In washim farmer s son commits suicide due to insolvency and agricultural problems pbk 85 css
Show comments