वाशीम : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु आहे. या यात्रेला कुठे चांगला तर कुठे अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी अधिकारी यांनीच यात्रेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जाऊन विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करीत आहे. ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू आहे. तिचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडले होते. त्यावेळी सर्वच विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर जिल्ह्यात ही यात्रा प्रचार व प्रसार करीत आहे. विकसित भारत संकल्प करिता वाहनातून विविध योजनेची माहिती नागरिकांना दिली जात आहे.

ही मोहीम सुरूवातीच्या दिवसांत जनतेच्या आवडीची ठरली होती. तिला काही ठिकाणी चांगला तर कुठे अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा अंतिम टप्प्यात असून अनेक ठिकाणी महत्वाचे अधिकारीच गैरहजर असल्याचे दिसून येते. काही शासकीय योजनेचे प्रात्यक्षित जनतेला करून दाखविण्याची गरज असताना ते दाखविले जात नसल्याचा आरोप जनतेतून होत आहे. अनेक ठिकाणी हा रथ लोक शेतात गेल्यानंतर उशीरा येत असल्याने नागरिकांचा अत्यल्प प्रतिसात मिळत आहे. काही गावातील ग्रामसेवक व इतर कर्मचारी गैरहजर असल्याने विकसित भारत संकल्प यात्रा दुर्लक्षित होत आहे.

Mumbai Municipal Corporation, 28 crore expenditure,
मुंबई : सोहळ्यांचा पालिकेला भुर्दंड; लोकसभा, विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी २८ कोटींचा खर्च
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
Zopu scheme, MHADA developer, MHADA,
‘झोपु’ योजनेत म्हाडा विकासक, पहिल्यांदाच जबाबदारी; चार प्रस्ताव प्राधिकरणाकडे

हेही वाचा : हेल्मेट न वापरल्यामुळे १२० दुचाकी चालकांचा मृत्यू, अकोल्यात तीन वर्षांत ४९६ जणांचा अपघातात बळी

अधिकारी उदासीन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी फिरत आहे. मात्र योजनेची माहिती सांगणारे विविध विभागाचे अधिकारी गैरहजर राहत आहेत. तर लोकप्रतिनिधी यांनी देखील या यात्रेकडे दुर्लक्ष केल्याची स्थिती आहे. अनेकदा गावातील ग्रामसेवक व इतर कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने विकसित संकल्प भारत यात्राच जिल्ह्यात दुर्लक्षित ठरत आहे.