वाशीम : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु आहे. या यात्रेला कुठे चांगला तर कुठे अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी अधिकारी यांनीच यात्रेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जाऊन विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करीत आहे. ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू आहे. तिचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडले होते. त्यावेळी सर्वच विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर जिल्ह्यात ही यात्रा प्रचार व प्रसार करीत आहे. विकसित भारत संकल्प करिता वाहनातून विविध योजनेची माहिती नागरिकांना दिली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in