वाशीम : सध्या दिवाळीसाठी नागरीक आपआपल्या गावी जात आहेत. त्यामुळे प्रवाशी संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र याच संधीचा फायदा घेत काही खासगी ट्रॅव्हल्सवाले गैरफायदा घेत आहेत. असाच काहीसा प्रकार वाशीम शहरात उघडकीस आला. पुण्याहून एका खासगी ट्रॅव्हल्सने पुसद येथे जाणाऱ्या प्रवाशांना चालकाने चक्क वाशीम शहरात उतरून दिले. त्यामुळे गावी जाण्याची आस असलेल्या प्रवाशांची फसवणूक झाली. ते न्यायासाठी फिरले आणि हताश होऊन मिळेल त्या वाहनाने गावाकडे परतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीच्या दिवशी काही युवक, महिला व इतर प्रवाशी पुणे येथून एका खासगी ट्रॅव्हल्सने पुसद करीता प्रवासाला निघाले. सकाळी ही बस वाशीम पासून काही अंतरावर पोहचली. तेव्हा प्रवाश्यांना बस मधून खाली उतरविले व ती बस निघून गेली. त्यावेळी चालकाने प्रवाशांशी वाद घातला. यावर काही युवकांनी थेट बस मालकाला फोन करून माहिती दिली. मात्र मालकाने देखील प्रवाशांशी दमदाटी केली. त्यानंतर त्या युवकांनी शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यास गेले असता त्यांची तक्रार घेण्यास नकार देत परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांनी परिवहन अधिकारी यांना फोन केला मात्र त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी उतरलेले प्रवाशी सायंकाळ पर्यंत न्याय मिळेल म्हणून प्रयत्न करीत होते. अखेर हताश होऊन ते मिळेल त्या वाहनाने गावी परतले.

हेही वाचा : चंद्रपूर : अनधिकृत बॅनर, होर्डिंग्सचा सुळसुळाट; …तर व्यावसायिकांना जबाबदार धरणार

सध्या दिवाळीची धामधूम सुरु आहे. प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मिळेल त्या वाहनाने प्रवाशी प्रवास करीत आहेत. मात्र त्यांची फसवणूक होत असून परिवहन विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. अनेक खासगी बस चालक प्रवाष्याकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारीत असून लूट करीत आहेत. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा : प्रदूषणमुक्त दिवाळीला ‘फटाके’; कर्णकर्कश आवाज व धुरामुळे आरोग्यासह पर्यावरणाला धोका

परिवहन विभागाची मुक संमती ?

दिवाळीमुळे वाढत्या प्रवाशी संख्येचा फायदा घेऊन काही ट्रॅव्हल्स नियमाचे पालन करीत असल्या तरी काही खासगी बस चालकाकडून मनमानी पद्धतीने भाडे करून प्रवाशांची लूट करीत आहेत. अनेक खासगी बस चालक नियम मोडून चालवल्या जात आहेत. प्रवाश्यांना कुठल्याच सोई सुविधा दिल्या जात नाहीत. प्रवश्यांची फसवणूक झाल्यास कुणाकडे तक्रार द्यायची याबाबत कुठलेच नियोजन नसल्याने एक प्रकारे खासगी ट्रॅव्हल्स वाल्यांना परिवहन विभागाची मुक संमती तर नाही ना ? असा प्रश्न प्रवाशी वर्गातून होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In washim private travel bus drop passengers at washim who buy ticket of pusad pbk 85 css
Show comments