वाशीम : जात प्रमाणपत्र पडताळणी विभागात अनेक विद्यार्थी, निवडणुकीस सामोरे जाणारे उमेदवार यांना अनेक दिवसांपासून जात प्रमाणपत्र समितीकडे त्रुटीची पूर्तता करून देखील मिळत नव्हते. जात पडताळणी विभागामार्फत त्यासाठी पैसे मागितल्याच्या अनेक तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त झाल्या असल्यामुळे थेट जात पडताळणी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारून वेळेत दाखले न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थ्यांच्या नौकरी, शिक्षण संबंधात अनेक अडचणी येत आहेत तसेच ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात अनेक निवडून आलेले उमेदवार दिलेल्या वेळेत आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करू न शकल्या मुळे अपात्र ठरविण्यात आले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ सुधीर कवर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह २४ नोव्हेंबर रोजी समाजकल्याण विभागाच्या जात पडताळणी कार्यालयात धडक देत समिती अध्यक्ष यांना जाब विचारला. समितीच्या अध्यक्षांनी १ महिन्याच्या आत २८ डिसेंबर पर्यंत १००० च्या वर प्रलंबित सर्व प्रकरण निकाली काढू असे आश्वासन दिले.

हेही वाचा : “पीक नुकसानीवर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या”, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी; म्हणाले, “हिवाळी अधिवेशनात…”

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर कवर जिल्हा समन्वयक सुरेश मापारी उपजिल्हाप्रमुख डॉ. चंद्रशेखर देशमुख, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील राऊत , विधानसभा प्रमुख, अशोक अंबोंरे, तालुका प्रमुख,रामदास मते पाटील, उद्धवराव गोडे पाटील, रामदास सुर्वे पाटील, विलास सुरडकर, नारायणराव आरु, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, तालुका संघटक, संतोष सुर्वे.बबन सावके, घनश्याम मापारी, देवानंद गुट्टे, नामदेव हजारे, राजाभैया पवार,भगवान बोरकर, गजानन बोरचाटे, गजानन जैताडे, अकील भाई तेली,सर्कल प्रमुख,आनंदा पाटील काळे, नंदकिशोर भोयर रामकृष्ण वानखेडे माऊली,रमेश घुगे, निलेश पेंढारकर, सचिन राऊत, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.