वर्धा: राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळून आहेत. येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रकानुसार मुंबईत मुख्यमंत्री तर उर्वरित जिल्ह्यात पालकमंत्री राष्ट्र ध्वजारोहण करतील. मात्र काही मंत्री एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री असल्यास शासनाकडून त्यांना एक जिल्हा निश्चित करून देण्यात येईल, असे नमूद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते कोणत्या जिल्ह्यात झेंडावंदन करणार हे अद्याप कळलेले नाही. त्यांची पसंती गृह जिल्हा नागपूर की अन्य जिल्हा राहणार, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा… धान्यात अफरातफर भोवली; आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार निलंबित

कार्यक्रमस्थळी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री उपस्थित राहू न शकल्यास विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, असे सूचित आहे. दोन महसूल विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपूर व अमरावती येथे फडणवीस हेच पालकमंत्री असल्याने त्यांची पसंती कुठे, हे १५ ऑगस्टलाच कळणार.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In which district devendra fadnavis will hoist the flag on independence day pmd 64 dvr