बुलढाणा: जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरापासून नजीक असलेले सागवान हे सधन शेतकऱ्यांचे गाव. या गावातील आज सकाळच्या एका घटनेने गावकऱ्यासह संपूर्ण बुलढाणा तालुका हादरला आहे. सागवान गावात काल गुरुवारी , ११ जुलै रोजी संध्याकाळी मुक्कामी आलेल्या एका जावयाने गावातील मंदिराच्या घंटेला भगव्या वस्त्राचा गळफास लावून घेत आत्महत्या केली .आज शुक्रवारी ( दिनांक बारा) सकाळी ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळी शेतात वा अन्य कामासाठी बाहेर पडलेल्या काही गावकऱ्यांना हे धक्कादायक दृश्य पाहिले आणि त्यांना धक्काच बसला. गावकऱ्यांनी थोडे जवळ जाऊन आणि निरखून पाहिल्यावर घंटीला गळफास लावून लटकलेला ‘तो’ गावाचा जावई असल्याचे निष्पन्न झाले. उपस्थित गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यावर आणि काहींनी ‘त्या’ इसमाच्या घरी ( सासुरवाडीत) जाऊन ही माहिती दिल्यावर गावात एकच आकांत उसळला. सासुरवाडी मधील इसमांसह गावकऱ्यांनी सागवान गावातील देवीच्या मंदिराकडे धाव घेतली. सागवान गावचे पोलीस पाटील जाधव , काही समाजसेवक यांनी घटनेची माहिती बुलढाणा पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : आता ताडोबाच नाही तर नवेगावातही व्याघ्रदर्शन..

गजानन गुंजाळ ( वय एकोण चाळीस, राहणार अंभोडा, तालुका बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या इसम ( जावयाचे) नाव आहे. मृत गुंजाळ हे अंभोड्याचे रहिवासी असून ते शेतमजुरीचे काम करतात. सागवान ही त्यांची सासरवाडी आहे. अलीकडे त्यांची पत्नी माहेरी म्हणजे सागवान मध्ये आली होती पत्नीला भेटण्यासाठी ते गुरूवारी सागवान येथे आले होते. दरम्यान, रात्रीतून काय झाले कुणास ठाऊक? आज शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेहच आढळला. गुंजाळ यांनी अचानक आत्महत्या का केली? याचे गूढ अद्याप कायम आहे. या दुर्दैवी घटनेने मृताचे मूळ गाव अंभोडा येथेही खळबळ उडाली आहे. त्यांचे सोयरे देखील सागवान मध्ये दाखल झाले. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की , गजानन गुंजाळ हे अतिशय नम्र आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांना कुठलेही व्यसन नव्हते.

हेही वाचा : यवतमाळ: नेरच्या महिलेचा तिरुपती येथे अपघाती मृत्यू

त्यामुळे रात्रीतून काय झाले, काय बिनसले? की, गजानन गुंजाळ यांनी थेट मंदिरात जाऊन गळफास लावून घेत स्वतःला संपवून घेतले?? असे प्रश्न उपस्थित झाले आहे. गाव परिसरात विविध तर्क वितर्क, शंका कुशंकाना उत आला आहे. बुलढाणा पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यावर मंदिर परिसराचा पंचनामा केला. गुंजाळ यांचा मृतदेह मंदिराच्या घंटीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी भगव्या वस्त्राने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. गुंजाळ यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal a person commits suicide by hanging to temple bell in midnight after quarrel with wife scm 61 css