यवतमाळ : उमरखेड येथे शाळेत निघालेल्या एका पाचव्या वर्गातील बालिकेला दुचाकीवर सोडून देण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली. अजिज खान मोहमद खान पठाण (४९) (रा. नागापूर रुपाळा, ता. उमरखेड) असे या आरोपीचे नाव आहे. अजिज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या शिरावर २२ पेक्षा अधिक गुन्हे नोंद असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१० ऑक्टोबर रोजी शाळेला जाण्यासाठी निघालेल्या ११ वर्षीय मुलीला आरोपी अजिजने पळशी (नवीन) बसथांब्यावर सकाळी साडेदहा वाजता गाठले. बसची वाट पाहत असलेल्या या मुलीला भावनिक बतावणी करून आरोपीने आपल्या दुचाकीवर बसवून बेलखेड शिवारात नेले. तेथे बळजबरी अत्याचार केला. नंतर तिला शहरात आणून सोडले. त्यानंतर चिमुकलीने आपबिती कथन केली. पोफाळी पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आणि घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच आरोपीचा शोध सुरु केला.

हेही वाचा : धान घोटाळ्याप्रकरणी कोटलावार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; जिल्ह्यातील ४२ गिरणी मालकही चौकशीच्या फेऱ्यात

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक साहाय्य व नागरिकांच्या मदतीतून शहरानजीक असलेल्या नागापूर (रुपाळा) येथून आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण याला अटक करण्यात आली. आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण याने यापूर्वी काही महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्यांना ठार मारले. हे गुन्हे मराठवाडा-विदर्भातील पोलिस ठाण्यांमध्ये नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे. नुकताच तो कारागृहातून पॅरोलवर गावी आला होता. नेमका याच काळात त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक विनय कोते, एसडीपीओ प्रदीप पाडवी, पोफाळी ठाणेदार दीपक ढोमणे पाटील यांच्यासह उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ आणि पाच पथकातील कर्मचारी यांनी आरोपीचा छडा लावला. या गुन्ह्यात पोफाळी ठाणेदार दीपक ढोमणे पाटील तपास करत असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे डॉ. पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा : निराधारांची दिवाळी होणार गोड!; अनुदानात वाढ, आता १५०० प्रति महिना मिळणार

आजी-माजी आमदारांनी केली मागणी

उमरखेड शाळा परिसरात रात्री काही शाळकरी मुले व काही तरुण अमली पदार्थ सेवनाच्या आहारी जात आहे. पोलिसांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी छापे मारावे, असे पत्रपरिषदमध्ये माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी सांगितले. यावेळी जिजाऊ बिग्रेडच्या जिल्हा अध्यक्षा सरोज देशमुख, दता गंगाधर उपस्थित होते. पत्रपरिषदेनंतर आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी एसपींची भेट घेत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. दरम्यान, निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी उमरखेड शहरात आज शुक्रवारी जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक संजय गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेकडो नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

हेही वाचा : बुलढाण्याच्या प्रणालीची राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत दमदार कामगिरी

आरोपीवर खुनाचे १० गुन्हे

आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण रा. रुपाळा (नागापूर) याच्यावर खुनाचे १० गुन्हे व इतर १२ असे २२ च्या वर गुन्हे नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांत दाखल आहेत. इतर गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना तो २७ सप्टेंबर रोजी जमानतीवर बाहेर आला होता. त्यानंतर हा गुन्हा घडवून आणला. हा खटला जलदगती न्यायालयात चांगले सरकारी अभियोक्ता मागवून आरोपीला लवकर जमानत मिळू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी सांगितले.