यवतमाळ : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महात्मा गांधींसह शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. शिवाय बँकेच्या अहवाल पुस्तिकेवर गोडसे यांचे छायाचित्र छापल्याने सर्वस्तरातून टीका होत आहे. या सभेत कामगारांनी गदारोळ करून अहवाल फाडला का, असे विचारताच सदावर्ते यांनी छदम हास्य करीत, ‘ते शरद पवारांचे बगलबच्चे तांदळातल्या खड्यासारखे तिघेजण होते. कुठलाही गदारोळ झाला नाही. कष्टकरी हे जय श्री राम, वंदे मातरम म्हणत होते. स्वत:ला कामगार संघटनेचा म्हणवून घेणाऱ्या संदीप शिंदेंना आत धडा शिकवण्याची गरज आहे. संदीप तुला सांगतो, ज्या अहवालावर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो आहे, ज्यावर हिंदू राष्ट्र हमारा लिहिले आहे, त्या अहवालास तू हात लावण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही तुला झोडपून बाहेर काढले आहे. शरद पवारांच्या विचारांना जसे झोडपून काढले तसेच त्यांच्या बगलबच्चांनासुद्धा हाकलून लावले आहे.’

हेही वाचा : सरळसेवा भरतीमधून २६५ कोटींचे शुल्क जमा, वाचा कुठल्या भरतीसाठी किती अर्ज आणि शुल्क

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा

अहवालावरील गोडसेंच्या छायाचित्रावर विरोधकांनी आक्षेप घेतल्याबाबत ॲड. सदावर्ते यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, ‘अखंड भारताचे भाग्यविधाते नथुरामजी गोडसे यांची अखंड भारताची भूमिका आजही प्रत्येक हिंदुस्थानी काळजामध्ये ठेवून आहे. कुणालासुद्धा भारताचे तुकडे पसंद नाहीत, आज तोच विचार आहे. गांधीजींचा विचार आता शिल्लक राहिलेला नाही. अखंड भारताचाच विचार शिल्लक आहे. पाकिस्तान देण्याचा विचार शिल्लक नाही. म्हणून त्यांचे विचार काँग्रेसी कधीच संपवू शकत नाही आणि हे असे थातूर मातूर, तुटक्या फुटक्या विचारांचे तर कधीच संपवू शकत नाही. त्यांची लायकीच नाही. शरद पवारांचा विचारसुद्धा नथुराम गोडसेंच्या पायाच्या धुळीइतका नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.’

हेही वाचा : “हे पाळलेल्या कुत्र्याचे दुकान नाही”, ॲड. गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली…

एसटी को-आपरेटिव्ह बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी सौ. सदावर्ते यांच्या निवडीचा घाट या सभेत उधळून लावल्याबद्दल बोलताना सदावर्ते यांनी, ‘ते (विरोधक) मार खावून उठून गेलेत. आमचे सर्वच ठराव पास झाले. डंके की चोटपे, आमचा एकही ठराव नामंजूर झाला नाही’. याचवेळी सदावर्ते दाम्पत्याने प्रश्नकर्त्यास सर्वत्र कॅमेरा फिरवा,अशी दमदाटीही केली. सहकार क्षेत्रातील शरद पवारांसारख्या चुकीच्या विचाराला नेस्तनाबूत करण्यासाठी पुढे आलो आहोत, अशी पुष्टीही ॲड. सदावर्ते यांनी यावेळी जोडली. बँकेचे संचालकपद क्षुल्लक आहे, या क्षुल्लक गोष्टीसाठी गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील निर्माण झाले नाहीत, तर शदर पवारांचा मूळ विचार संपविण्यासाठी आम्ही तयार झालो आहोत, असे सदावर्ते यांनी आवेषात सांगितले.

हेही वाचा : नागपूर : विमान प्रवासात दोन कोटींचे सोने लपवण्याची पद्धत पाहून सर्वच थक्क…

बँक वाचविण्यासाठी आम्ही गांधीजी होऊ – बरगे

एसटी को. ऑप. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी प्रसिध्द केलेल्या अहवालाच्या मुख पृष्ठावर गोडसेचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. बँकेच्या दैदिप्यमान ७० वर्षात कधीही असे घडलेले नाही. बँकेचा अहवाल कसा असायला हवा हे ठरलेले आहे. त्याला छेद देत अहवाल छापण्यात आला आहे. बँकेचा वापर दहशतवादी प्रवृत्ती तयार करण्यासाठी होत असून ते दहशतवादी प्रवृत्ती तयार करणार असतील तर बँक वाचविण्यासाठी आम्ही गांधी होण्यास तयार आहोत, असा इशारा बँकेचे माजी सभासद व महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला.