यवतमाळ : ओडिशामधून यवतमाळात गांजाची खेप पोहोचण्यापूर्वीच नागपूर बायपासवर कारवाई करण्यात येऊन दोघांना अटक करण्यात आली. तर पुसद तालुक्यातील पारध येथेही गांजा जप्त करून एकाला अटक करण्यात आली. या दोन्ही कारवाईत नऊ लाख १४ हजार ८८० रुपये किंमतींचा गांजा व मुद्देमाल जप्त करण्यात आला. ओडिशामधून यवतमाळात येत असलेल्या गांजा जप्तीची कारवाई नागपूर बायपासवर मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. सदर पथक कार्यालयात हजर असताना त्यांना राखाडी रंगाच्या कारमधून देवगाव येथून बाभूळगाव मार्गे गांजा येत असल्याची टीप मिळाली. त्या वाहनावर इंग्रजीत पठाण असे लिहिले होते आणि काचांना काळ्या रंगाची फिल्म लावली होती.

हेही वाचा : “फक्त दहा दिवसांच्या अधिवेशनासाठी येणाऱ्या मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत”, शरद पवार गटाकडून सरकारवर ‘बॅनरास्त्र’

Bus Passenger Thrashes Conductor After argument over change money
नागपूर : सुट्या पैशांवरून बाचाबाची; एसटी बसच्या वाहकाला मारहाण…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
debt collectors false case news in marathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या
minor detained for stealing vehicles for fun 5 two wheelers two rickshaws seized
मौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात; पाच दुचाकी, दोन रिक्षा जप्त
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
Transport e-challans worth Rs 2500 crore pending across the state
दंडात्मक कारवाईला ‘खो’; राज्यभरात अडीच हजार कोटींवर वाहतूक ई-चालान प्रलंबित

एलसीबीचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी यवतमाळ येथील बाभूळगावकडून नागपूरकडे जाणार्‍या बायपासवर सापळा रचला. संशयित वाहनाला थांबविले. त्यात सलमान शेख शकील शेख (२८, रा. अंबिकानगर), चालक सलमान शेख इक्बाल शेख (२६, सुराणा ले-आउट, यवतमाळ) बसलेले होते. वाहनाची तपासणी केली असता, डिक्कीत एका पोत्यात तीन लाख सात हजार ४४० रुपये किंमतीचा १५ किलो ३७२ ग्रॅम गांजा आढळला. हा गांजा ओडिशा येथील आनंद शाहू (बडगड) याच्या माध्यमातून अनिल यादव या ट्रक चालकाकडून तळेगाव येथील बायपासवर उतरविण्यात आल्याची कबुली सलमान शेख याने दिली. गांजा व वाहन असा एकूण सहा लाख ४२ हजार ४४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सलमान शेख शकील शेख, सलमान शेख इक्बाल शेख, आनंद शाहू, अनिल यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यापैकी सलमान शेख याच्यासह वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस नेते नितीन राऊत उपोषणावर, कारण…

दुसऱ्या घटनेत, पुसद तालुक्यातील पारध येथील रमेश शिवाराम जाधव व पुतण्या इंदिल हिरालाल जाधव हे दोघे विक्री करण्यासाठी गांजा बाळगून असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांना मिळाली. त्यावरून सोमवारी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. रमेश जाधव व इंदल यांच्या घरातून दोन लाख ७२ हजार ४४० रुपये किंमतीचा १३ किलो ६८२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, पुसदचे ठाणेदार राजेश राठोड, सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, सपोनि गणेश वनारे यांच्यासह पथकाने केली.

Story img Loader